शिवत्वातून सामाजिक एकत्रीकरण
शिवरायांचे आठवावे रूप
शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप
भूमंडळी ||
आजच्या काळात सामाजिक एकत्रीकरणासाठी
शिवरायांच्या आदर्शांचे पालन केले पाहिजे. शिवरायांनी कधीच एकाच धर्माचा आग्रह
धरला नाही, त्यांना सर्व धर्मांबद्दल आदर होता. त्यांच्या स्वराज्याची व्याख्या
हीच होती कि सामाजिक एकत्रीकरण! धर्म विभाजन झाले कि विषमतेचा शिरकाव होतो.
धर्मावरून एकमेकांना कमी लेखले जाते, हे शिवरायांनी जाणले होते. माणूसकी हा एकच
धर्म ओळखला गेला पाहिजे. मानवहित जपून केलेला धर्म म्हणजे माणूसकी होय. हिताची
गोष्ट करताना व्यक्ती म्हणून नाही तर एक समाज म्हणून केली गेली पाहिजे. समाजात
विविधता आहे, ती टिकवायला समता लागते. ती समता शिवत्वाने एकत्र बांधली जाणार असेल
तर शिवत्वाचा अभ्यास व्हायला हवा. शिवत्व हि एक अभूतपूर्व शक्ती आहे. या
शक्तीबरोबरच विचारांचीपण गरज भासते. योग्य विचारांसाठी सामाजिक तत्वांचा अभ्यास
व्हायला हवा. फक्त एका समाजाचा विचार न करता सामाजिक विचार झाला पाहिजे. असा विचार
झाला तर संघटनेची गरज भासेल. संघटन झाले की मानवी तत्वे आणि शिवत्वाची सांगड घालता
आली पाहिजे. सामाजिक एकत्रीकरणासाठी या सर्व गोष्टी मिळून आल्या पाहिजेत. आजच्या
तरुणाईला शिवरायांच्या आदर्शांचा अभ्यास असायला हवा. त्यांचे आदर्श, गुण, तत्वे
यांचा अंगीकार जरी आजच्या तरूणाईने केला तरी सामाजिक एकत्रीकरण होण्यास मदत होईल व त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रगती म्हणजेच पर्यायाने देशाचीही प्रगती होईल.
0 comments :
Post a Comment