'मला भावलेला आणि समजलेला शाहरुख खान'
मनुष्याच्या यशाला
वर्त्तमानकाळातील प्रयत्नांबरोबरच भूतकाळातील कष्ट जबाबदार असतात.भूतकाळातील कष्टांमुळे वर्तमानकाळ सुकर होण्यास मदत
होते.जर तुम्ही वर्तमानात आराम
केला
तर
भविष्यकाळात आयुष्यभर मेहनत
करावी
लागते
पण
जर
वर्तमानात मेहनत
केली
तर
भविष्यात आराम
मिळतो
ह्याची
निवड
प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते.कष्टे आणि प्रयत्न जर
एकत्र
आले
तर
त्यातून मिळालेल्या यशाची
चव
निराळी
असते.शाहरुख खानने त्याच्या ऐन
उमेदीत
अत्यंत
मेहनत
करून
स्वतःला घडवले
आहे
त्यासाठी भूतकाळातील कष्ट पण
आहेत
आणि
वर्त्तमानकाळातील प्रयत्न!
सध्या आलेला 'FAN' हे एक यशच आहे कारण 'FAN'च्या मागे कष्ट आहेत आणि याचे संपूर्ण श्रेय शाहरुख खान याला जाते.या चित्रपटातील उकृष्ट अभिनयाने त्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत.या चित्रपटामुळे बॉलीवूडचा खरा किंग कोण आहे याची प्रचिती सर्वांनाच आली आहे.'FAN'च्या यशामागे कित्येक वर्षाची कठोर मेहनत आहे.लहानपणापासून केलेली धडपड आहे.'FAN' मुळे त्याचा भूतकाळ लोकांसमोर आला आहे.
'दीवाना' ते 'FAN' हा प्रवास फारच प्रशंसनीय आहे.शाहरुख खानच्या प्रत्येक कृतीमागे कष्ट आहेत. लहानपणापासून शाहरुख खानला अभिनयाचे वेड होते.बेटा कुछ काम करना और ना मन हो तो मत करना क्योंकि जो कुछ नहीं करते है वो कमाल करते है अशा कित्येक संदेशातून शाहरुख खान घडत गेला.मीर ताज मोहम्मद हे शाहरुखचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते तसेच त्यांचा अब्दुल गफर खानच्या चळवळीमधे सहभाग होता.घरच्या मोकळ्या वातावरणामुळे शाहरुखचे गुण बहरत गेले पण दुर्दैवाने वयाच्या १५व्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले त्याने खचून न जाता आईने घराची जबाबदारी घेतली आणि कुटुंबाला सावरले.दिल्लीत असताना शाहरुखने दिल्ली थिएटर ग्रुप मधे Barry John यांच्याबरोबर काम केले.त्यानंतर वयाच्या २५व्या वर्षी आईचा पण दुर्दैवी मृत्यु झाला.अशी दुर्दैवी परिस्थिती ओढवली असताना देखील वयाने मोठया असलेल्या बहिणीला त्याने सावरले आणि मुंबईला आला.
शाहरुखने आपल्या
कारकिर्दीची सुरवात
दूरदर्शनपासून केली.लेख टंडन यांच्या 'दिल
दरिया'
मधल्या
प्रमुख
भूमिकेने तसेच
'फौजी'
मधल्या
लेफ्टनंन अभिमन्यू राय
या
भूमिकेने सर्वांचीच मने
जिंकून
घेतली.त्यानंतर 'सर्कस','इडियट' व
'उम्मीद'
यामधे
प्रमुख
भूमिका
आणि
'वागळे
की
दुनिया'
यामधे
छोटी भूमिका
करून
दूरदर्शन क्षेत्रामधे मोठे
नाव
कमावले.आईच्या मृत्युनंतर थोडे
सावरल्यानंतर शाहरुखने चित्रपट क्षेत्रात पाऊल
ठेवायचे ठरवले.'दीवाना' या ब्लॉकबस्टर सिनेमातून त्याने
बॉलीवूड मधे
पदार्पण केले
आणि
पदार्पणातच फिल्मफेअर बेस्ट
मेल
डेब्यू
अवॉर्ड
पटकावले.तिथून
जी
घोडदौड
शाहरुखने सुरु
केली
ती
आजतागायत चालूच
आहे.'डर','बाजीगर,'अंजाम'
या
चित्रपटांमुळे तो
खलनायकी भूमिका
पण
कितपत
चांगल्या करू
शकतो
हे
सिद्ध
झाले.इथून त्याचा जो
प्रवास
सुरु
झाला
तो
प्रगतीकडेच पोहचला.'करण अर्जुन','दिलवाले दुल्हनियाँ ले
जायेंगे','यस
बॉस','परदेस','दिल तो
पागल
है','दिल से','कुछ
कुछ
होता
है'
अशा
उकृष्ट
चित्रपटांची वर्णी
त्याने
लावली.तसेच 'स्वदेस','चक
दे
इंडिया'
आणि
'माय
नेम
इज़
खान'
सारखे
दर्जेदार चित्रपट करून
सर्वांच्याच मनावर
अधिराज्य गाजवले.आत्तापर्यंत त्याला एकूण १४
फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले
असून
त्याला
भारताने पद्मश्री देऊन
गौरविले आहे
तसेच
त्याला
फ्रान्सने 'Legion of Honour' आणि 'Ordre des Arts et des Lettres' देऊन सन्मानित केले
आहे.
त्याचा हा प्रवास
फारच
मोठा
आणि
विलक्षण आहे.प्रत्येकाच्या
आयुष्यात चढऊतार
येतात,चढऊतार नसतील ते
आयुष्य
कसले? चढऊतारांना मनुष्य कसे तोंड
देतो
ते
महत्वाचे आहे.दिल्लीतील फुटपाथवर फिरणारा मुलगा एक दिवशी
मी
या
नगरीचा
बादशहा
असेन
असे
म्हणतो
तेव्हा
तो
बढाया
मारतोय
असे
वाटते
पण
जेव्हा
ते
स्वप्न
प्रत्यक्षात उतरते
तेव्हा
त्या
स्वप्नाची खरी
किमंत
कळते.शून्यातून विश्व उभारणे हे
याला
म्हणतात.
काही लोकांना शाहरुख
खान
अहंकारी वाटतो,तो आहेच पण
मानवाने कुठल्या बाबतीत
अहंकारी असावे
हे
महत्वाचे आहे.शाहरुख हा कामाबाबत अहंकारी आहे,त्याला माहित आहे
की
त्याच्याशिवाय ते
काम
कोणीही
चांगला
करू
शकणार
नाही
कारण
अभिनय
हा
त्याचा
प्रांत
आहे.थोडथोडका नव्हे तर तब्बल
५०
पेक्षा
जास्त
चित्रपटांचा त्याला
अनुभव
आहे.अनुभव हा कामातून झळकतो
आणि
त्यामुळेच कामाला
शोभा
येते.कामाबाबत अहंकारी बनल्यावर कामाचे महत्व अधिक
राहते.
आपण एखादया
व्यक्तिबद्दल लवकर
समज(गैरसमज) करुन घेतो.व्यक्तीच्या चांगल्या गोष्टींपैकी आपल्याला सदैव वाईट गोष्टी
लक्षात
राहतात.व्यक्तीच्या प्रगतीकडे लक्ष न देता
तो
अधोगतीला कसा
जातोय
हे
जाणून
घेणे
आपल्याला जास्त
गरजेचे
वाटते.अनुभवापेक्षा आपण जास्त ऐकीव
गोष्टींवर विश्वास ठेवतो
आणि
एवढे सर्व
करुन
आपण
स्वतःला भारताचा एक
सुजाण
व
सजग
नागरिक
म्हणून
संबोधितो.
शाहरुख खानचे
चित्रपट क्षेत्रातील भव्य
कामाबरोबरच सामाजिक कार्यात पण
फार
मोठे
योगदान
आहे.इतरांसारखी सामाजिक कामांची प्रसिध्दी करणे त्याला कधी
जमलेच
नाही.शाहरुख खान असा
एकमेव
भारतीय
कलाकार
आहे
की
ज्याला
युनेस्कोचा 'Pyramide Con Marni Award' मिळाला आहे.दानावरती विश्वास असलेला शाहरुख कुराणाचा उल्लेख
करतो
की
तुम्ही
कुठल्या कारणासाठी जर
दान
केले
तर
ते
दान
राहत
नाही.
देशातील ३६
खेडेगावातील हजारो
लोकांच्या घरात
सोलार
एनर्जी
देऊन
त्यांच्या आयुष्यात प्रकाश
आणणाऱ्या शाहरुख
आपल्याला का
दिसत
नाही?शाहरुख सारखा कलाकार
आपल्या
आईच्या
स्मरणार्थ नानावटी हॉस्पिटलास देणगी
देतो
हे
मीडियाला कळायला
९
वर्षे
लागतात?तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे व
अपंगांना नोकरीत
प्राधान्य मिळावे
म्हणून
लढणाऱ्या संघटनांच्या मागे
खंबीरपणे उभा
राहणारा शाहरूख
खान
आपल्याला ठाऊक
नसतो
पण
वानखेडेमधे सुरक्षा रक्षकाशी भांडण
केले
ह्या
घटनेला
मात्र
अवास्तव प्रसिध्दी दिली
जाते.सरकारच्या पोलिओ मुक्त भारत
तसेच
एड्स
कंट्रोल अभियानाचा ब्रँड
अॅम्बेसेडर शाहरूख
आहे
ह्याकडे आपण
दुर्लक्ष करतो
पण
पाकिस्तानाला मदत
केली
ही
गोष्ट
आपण
लक्षात
ठेवतो.देशात त्सुनामी आली
म्हणून
आपल्या
सहकारी
कलाकारांना बरोबर
घेऊन
कार्यक्रम आयोजित
करून
त्यासाठी लाखो
करोडो
रुपयांची मदत
करणाऱ्या शाहरूखला आपण
पाकिस्तानात निघून
जा
असे
सहज
सुनावतो?नरेंद्र मोदी
पंतप्रधान झाले
तर
मी
हा
देश
सोडून
पाकिस्तानात राहायला जाईन
अशी
बाष्कळ
व
निरर्थक विधाने
त्याच्या नावावर
खपवून
त्याची
बदनामी
करण्यापेक्षा लोकांनी लोकांचा अभ्यास
करावा.
कुठल्याही व्यक्तीचे आपण
कौतुक
करताना
आपण
आधी
धर्माकडे बघतो
असे
मला
मनस्वी
वाटते.
अरे
हा
तर
मुस्लिम धर्माचा आहे!हा कसे काय
चांगले
काम
करू
शकतो?
असे
प्रश्न
समाजाला नेहमी
पडत
असतात.
यासाठी
भूतकाळ
जबाबदार आहे.
विशिष्ट लोकांनी समाजावर केलेले
अत्याचार म्हणून
तो
धर्म
एकप्रकारे कलंकित
झाला
आहे
आणि
त्यामुळे कदाचित
त्या
धर्मातील लोक
जरा
वेगळे
वाटायला लागतात.
मनुष्य
हा
जन्माला येताना
कुठल्याच धर्माचा नसतो
मग
त्यावर
एका
विशिष्ट धर्माचा शिक्का
बसतो.
आपली
आवड
ही
धर्मनिरपेक्ष हवी.आपण जर एखादयाचा धर्म
बघून
त्यांच्या कर्माची स्तुती
अथवा
निंदा
केली
तर
ती
आवड
अथवा
नावड
व्यर्थ
असते.मनुष्य कर्माने मोठा
होतो.धर्म हे फक्त
एक
बिरुद
असते.शाहरुखच्या बाबतीत पण काही
लोक
धर्मावरुन दुजाभाव करतात.धर्म बघून समाजातील स्थान
ठरवतात.जेव्हा आवड ही
कर्मावरून होईल
तेव्हा
लोकांना शाहरूख
खानला
देशद्रोही म्हणण्याची गरज
भासणार
नाही.
कुठल्याही व्यक्तीचे आपण कौतुक करताना आपण आधी धर्माकडे बघतो असे मला मनस्वी वाटते. अरे हा तर मुस्लिम धर्माचा आहे!हा कसे काय चांगले काम करू शकतो? असे प्रश्न समाजाला नेहमी पडत असतात. यासाठी भूतकाळ जबाबदार आहे. विशिष्ट लोकांनी समाजावर केलेले अत्याचार म्हणून तो धर्म एकप्रकारे कलंकित झाला आहे आणि त्यामुळे कदाचित त्या धर्मातील लोक जरा वेगळे वाटायला लागतात. मनुष्य हा जन्माला येताना कुठल्याच धर्माचा नसतो मग त्यावर एका विशिष्ट धर्माचा शिक्का बसतो. आपली आवड ही धर्मनिरपेक्ष हवी.आपण जर एखादयाचा धर्म बघून त्यांच्या कर्माची स्तुती अथवा निंदा केली तर ती आवड अथवा नावड व्यर्थ असते.मनुष्य कर्माने मोठा होतो.धर्म हे फक्त एक बिरुद असते.शाहरुखच्या बाबतीत पण काही लोक धर्मावरुन दुजाभाव करतात.धर्म बघून समाजातील स्थान ठरवतात.जेव्हा आवड ही कर्मावरून होईल तेव्हा लोकांना शाहरूख खानला देशद्रोही म्हणण्याची गरज भासणार नाही.
कुठल्याही व्यक्तिबद्दल असलेला
आंधळा
तिरस्कार हा
फक्त
मूर्खपणाकडे नेतो.तसेच आंधळे प्रेम
हे
अधोगतीकडे नेते.एखादया व्यक्तीच्या आदर्शांचे एवढे
पालन
करावे
की
त्याचा
अतिरेक
होता
कामा
नये.त्या व्यक्तीच्या आदर्शांचे पालन
करताना
स्वतःच्या 'स्व'ची ओळख विसरता
कामा
नये.
आवडलंय..
ReplyDelete