घरातून रोज कॉलेजला जाताना मला विविध गोष्टींचं दर्शन होतं. रोजचाच रस्ता
असल्याने रस्त्यावरील एकएक गोष्ट नजरेत बसते. खड्डयांच्या गर्दीमध्ये हरवलेला
रस्ता, फुटपाथवर झालेलं अतिक्रमण, ऐन कामाच्या वेळी लागलेलं
ट्रॅफिक, पीएमपीच्या दारात लोंबकळणारे प्रवासी, दिवसाढवळ्या चालू असलेले पथदिवे असे अनेक 'प्रॉब्लेम्स'
रोज पाहायला मिळतात. मी पत्रकारितेचा विद्यार्थी असल्याने या समस्या
मनाला अधिक लागतात. वरवर या साध्या दिसत असल्या तरी पुणेकरांना यांचा प्रचंड
प्रमाणात त्रास होतो. माध्यमंही या समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात हे
मोठंच प्रश्नचिन्ह आहे. सारासार विचार केला तर या समस्यांवर कोणाकडेच ठोस उत्तर
नाहीये, पण किमान पुणे शहरात या समस्या अस्तित्वात आहेत याची
जाणीव तरी सर्वांना व्हायला हवी.
वृत्तपत्रांतून 'वाचकांचा पत्रव्यवहार'मधूनच यांसारख्या बातम्या
आपल्याला कळतात, पण दृक्श्राव्य माध्यमांवर यांसारख्या
विषयांची वानवाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची नितांत
गरज आहे. सध्याच्या या डिजिटल युगात योग्य पर्यायाची निवड करणं क्रमप्राप्त आहे,
आणि म्हणूनच तीन मित्रांनी एकत्र येऊन 'न्यूजलूक'
(Newslook) या 'सिटिझन जर्नालिझम'वर आधारित ॲपची निर्मिती केली आहे. प्रतिक मासुळकर, रोहित गिते, अक्षय नारखेडे या तरुणांनी वाचकांचा पत्रव्यवहार
म्हणजेच Letters to
the Editor याच्यापुढे जाऊन, आजच्या डिजिटल युगात या ॲपच्या माध्यमातून भक्कम
पाऊल टाकलं आहे.
रस्त्यावरून जाताना दिसलेली कुठलीही समस्या असेल, लगेच त्याचं छायाचित्र
किंवा व्हीडिओ काढून या ॲपवर टाकता येतो. कोणतंही छायाचित्र किंवा व्हीडिओ जतन
करून नंतर वापरण्याची या ॲपमध्ये सोय नसल्याने हेच या ॲपचं वेगळेपण आहे. यातूनच
पत्रकारितेसाठी आवश्यक असलेली 'विश्वासार्हता' जपली जाते. छायाचित्र किंवा व्हीडिओ पोस्टमध्ये समाविष्ट करणं बंधनकारक
असल्याने या ॲपवर 'फेक न्यूज' पोस्ट
करता येत नाही. याचबरोबर छायाचित्रं आणि व्हीडिओला कॅप्शन आणि डिस्क्रिप्शन द्यावं
लागतं. थोडक्यात सांगायचं तर या ॲपमुळे आता लोकांच्या 'खऱ्या
समस्या' समोर येणं सोपं होणार आहे.
ही सर्व झाली या ॲपची माहिती. पण या ॲपमुळे नक्की काय परिणाम साध्य होत आहेत
की होणार आहेत हेही आपण पाहायला हवं.
सामान्य नागरिकांच्या हातात 'न्यूजलूक'च्या माध्यमातून एक अनोखी ताकद
आली आहे. कुठल्याही वृत्तसंस्थेला कोणाचे तरी पाठबळ असतं त्यामुळे कदाचित त्या
वृत्तसंस्थेवर, काम करण्याच्या शैलीवर फरक पडतो पण 'न्यूजलूक' या बाबतीत फार वेगळं आहे. टीआरपीचे गणित
आणि कोणत्याही आयडोलाॅजीचे पाठबळ नसल्याने सर्वसमावेशक न्यूज कंन्टेट आपल्याला 'न्यूजलूक'वर पाहायला मिळतो.
आपल्या आयुष्यात आपल्याला कुठल्याही आपत्तीला कधीही सामोरं जावं लागतं.
आत्ताचंच उदाहरण घेतलं तर पुण्याच्या दक्षिण भागात म्हणजेच कात्रज, लेकटाऊन
परिसरात अंबिल ओढयाला पूर आला होता. अशावेळी नागरिकांना तातडीच्या आणि गरजेच्या
सूचना द्यायला कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. दुर्दैवाने व्हाॅटसप आणि बाकीच्या
सोशल ॲपवरूनही काही दिसत नव्हतं. यांसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत 'न्यूजलूक' सारख्या ॲपचा नक्कीच उपयोग होईल. नागरिकच,
नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत सूचना, संदेश
देतील. कुठे रस्ता बंद केलाय, कुठले रस्ते टाळले पाहिजेत,
कुठे मदतीची गरज आहे यांसारख्या प्रश्नांना या ॲपवरून थेट उत्तर
मिळणार आहे.
या ॲपचा आणखी एक परिणाम म्हणजे लोकं आपल्या समस्या मांडणार आणि बाकीचे त्या
समस्यांचं लवकरात लवकर कसं निराकरण होईल हे पाहणार. यातूनच वेगवेगळे स्थानिक
समुदाय बनतील. हेच समुदाय लोकांसाठी काम करतील, लोकांच्याच विकासाचा विचार करतील. 'स्थानिक ते स्थानिक' असा प्रवास नक्कीच पुणे शहराला
एक नवीन दिशा मिळवून देईल यात शंका नाही.
शेवटी फक्त एकच सांगणं आहे, की हे ॲप जरूर वापरून पहा. कुठलीही गोष्ट वापरून किंवा जवळून
पाहिल्याशिवाय त्या गोष्टीबद्दल काहीतरी मत बनवणं चुकीचे आहे. त्यामुळेच एकदा
वापरा, नीट अनुभवा आणि आम्हाला नक्की कळवा!
खालील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता. त्याचबरोबर लिंकही
दिली आहे. तसेच तुम्ही आमच्याशी फेसबुक, इन्स्टाग्राम यावरूनही कनेक्ट होऊ शकता.
त्याच्याही खाली लिंक्स दिलेल्या आहेत.
इन्स्टाग्राम: https://instagram.com/newslookpune?igshid=1jtxfxg7i5vxc
वेबसाइट: www.newslookmedia.com
ई-मेल: info@newslookmedia.com